…नाहीतर ज्या हातानं सत्ता दिली, त्याच हातानं सत्ता घालवू- खासदार राजू शेट्टींचा सरकारला इशारा

…नाहीतर ज्या हातानं सत्ता दिली, त्याच हातानं सत्ता घालवू- खासदार राजू शेट्टींचा सरकारला इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

शेतकरी आंदोलनाचा दुसरा आणि तिसरा टप्पा चांगलाच उग्र होणार आहे याचाच इशारा नाशिकमध्ये दिसून आला. शेतकऱ्यांच्या मागण्या दोन दिवसांत मान्य करण्याचा राज्य सरकारला अल्टिमेटम देण्यात आला. नाहीतर ज्या हातानं सत्ता दिली त्या हातानं सत्ता घालवू असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

 

नाशिकमध्ये सुकाणू समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीत शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले दिसले. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. 12 जूनला धरणं आंदोलन तर 13 जूनला राज्यव्यापी रास्ता रोको आणि रेल रोकोचा इशारा देण्यात आला. वेळप्रसंगी सैतानाची मदत घेऊ पण तुमची सत्ता घालवू असा इशाराही यावेळी राजू शेट्टींनी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version