राजनाथ सिंह साईचरणी

राजनाथ सिंह साईचरणी

शिर्डी, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी द्वारकामाई आणि गुरूस्थानाचेही दर्शन घेतले.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मंदिरात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल, पशूसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेत पाद्यपूजा आणि आरती केली. साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा साईबाबा यांची मूर्ती भेट देत सन्मान केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version