कल्याण-डोंबिवलीचे महापौरांना ‘त्या’ प्रकरणी मोठा दिलासा

कल्याण-डोंबिवलीचे महापौरांना ‘त्या’  प्रकरणी मोठा दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण

 

कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय कल्याण सत्र न्यायाल्याने दिला होता.

मात्र, उच्च न्यायालयाने आता देवळेकरांना दिलासा दिलाय. 2012 साली देवळेकर यांना आपलं नगरसेवक पद गमवाव लागलं होतं.वैश्य वाणी समाजाला ओबीसी मधून वगळण्यात आल्यानं आपोआपच त्यावेळी त्यांचं नगरसेवक पद सुद्धा रद्द झालं होतं.

मात्र, पुन्हा 2015 साली झालेल्या नि डणुकीत देवळेकर निवडणूक लढले आणि जिंकून आले. याला त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजप चे अर्जुन म्हात्रे यांनी न्यायाल्यात आव्हान दिले. एकदा नगरसेवक पद रद्द झाल्यावर 6 वर्ष निवडणूक लढता येत नसूनही पुन्हा वाणी ही जात लावुन निवडणूक लढवणे हे बेकायदा असल्याचा दावा करत म्हात्रे यांनी कोर्टात धाव घेतलेली.

दरम्यान  या निर्णयाला सत्र न्यायालयाने उच्च न्यायालयात जाण्यासाठी  एक महिन्याची स्थगिती दिली होती. मात्र, आता राजेंद्र देवळणकर यांना उच्च न्यायालायने दिलासा दिलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version