वृत्तसंस्था, मुंबई
राजधानी एक्स्प्रेसखाली आल्यामुळे सौराष्ट्र जनता एक्स्प्रेसच्या लोको पायलटचा जागीच मृत्यू झालाय. लोको पायलट इंजिन तपासणीसाठी उतरला असताना हा दुर्दैवी अपघात घडलाय.
रविवारी संध्याकाळी बोईसरजवळ सौराष्ट्र एक्स्प्रेस साईडिंगला लावण्यात आली होती. ट्रेनच्या इंजिनच्या तपासणीसाठी लोको पायलट उमेश चंद्र आर हे उतरुन इंजिनखाली गेले. त्याचवेळी समोरुन राजधानी एक्स्प्रेस येत होती.
समोरुन येणारी राजधानी एक्स्प्रेस पाहून उमेश गडबडले आणि स्लीपरवर घसरुन राजधानी एक्स्प्रेसखाली आले. यामध्ये 45 वर्षीय उमेश यांचा जागीच मृत्यू झालाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.