विजयादशमीला दोन ठाकरी तोफा धडाडणार

विजयादशमीला दोन ठाकरी तोफा धडाडणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विजयादशमीला दोन ठाकरी तोफा धडाडणार आहेत. शिवतिर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ धडाडेल तर सकाळी राज ठाकरे पत्रकार परिषदेत आपल्या शैलीत तोफ डागतील.

 

दसऱ्याच्या आदल्याच दिवशी परळची रेल्वे दुर्घटना घडलीय. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू या दुर्घटनेवरुन केंद्र सरकारवर कशी तोफ डागतात हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.

 

त्यासोबतच शिवसेना आणि भाजपमधल्या कुरबुरींवर उद्धव ठाकरे काय प्रहार करणार याकडेही सर्वाचं लक्ष लागल आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version