जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या इंजिनाचे डबे घसरू नयेत यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे डोंबिवलीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पक्षापुढे नवा कार्यक्रम ठेवतात, झाडाझडती घेतात की व्यूहरचना ठरवतात याकडे मनसेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक फुटले. केडीएमसीतील मनसेचे नऊ नगरसेवक शिवसेना किंवा भाजपाच्या गळाला लागू नयेत. यासाठी राज ठाकरे यांनी हा दौरा आखल्याची चर्चा सुरु आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.