जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसे सध्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात जाहीर सभे घेतली.
या सभेत राज ठाकरेंनी परप्रांतीयांवर हल्लोबोल केला. तसेच मराठीच्या मुद्द्यावरही राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले.
समृद्धी महामार्गातून जर महाराष्ट्राची समृद्धी होणार असेल तर मला मान्य आहे. पण महाराष्ट्राचा पैसा वापरून जर समृद्धी महामार्ग करून महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न केलात तर मी समृद्धी महामार्ग तोडेन अशी चेतावणीही राज ठाकरेंनी दिली.
तसेच वेगळा विदर्भ होवू देणार नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली.
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
– फेरीवाल्यांकडून २ हजार कोटींचा हप्ता मिळतो, म्हणून हे सगळे राजकीय पक्ष फेरीवाल्यांच्या बाजूने उभे आहेत
– फक्त मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोट्यावधीचे कर्ज काढून बुलेट ट्रेन आणली जातेय; आणि याचं कर्ज देशवासीयांना फेडावे लागणार
– महाराष्ट्र जातीच्या राजकारणात गुंतवण्याचा डाव सुरु असून, महाराष्ट्रातलेच नेते खतपाणी घालतायत
– जगातली सगळी युद्ध ही जमिनीच्या मालकीसाठी झाली. म्हणून भूगोलाशिवाय इतिहास नाही
– बँकांचे व्यवहार मराठीतून झाले पाहिजेत
– महाराष्ट्रातले तरुण बेरोजगार असताना बाहेरचे येऊन डोळ्यासमोर रोजगार घेऊन जात आहेत
– समृद्धी महामार्गातून महाराष्ट्राची समृद्धी होणार असेल तर मला समृद्धी मार्ग मान्य पण, याच्या माध्यामातून महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न झाला तर मार्ग तोडून टाकेन
– महाराष्ट्र जातीच्या राजकारणात गुंतवण्याचा डाव सुरु असून, महाराष्ट्रातलेच नेते खतपाणी घालतायत
– मनसेने ब्लूप्रिंट आणली होती; गुजरातमध्ये ब्लुफिल्मच्या सीडी काढून निवडणुका लढवल्या जात आहेत
– आमच्या जिजाऊ महाराजांचा जन्म विदर्भातला तर शिवाजी महाराजांचा पुण्यातल्या. स्वतंत्र विदर्भ करून तुम्ही माय-लेकाची ताटातूट करणार असाल तर हे होवू देणार नाही
– उद्या आमची सत्ता येईल तेव्हा तुमच्यावर दरोड्याचा केसेस टाकेन
– पुण्यात फेरीवाल्यांच्या आंदोलनात 16 कार्यकर्त्यांना अटक करुन त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे टाकले
– मराठी पाट्यांच आंदोलन पुन्हा हातात घ्यावं लागेल
– सभा मैदानात नाही तर कुठे घ्यायच्या
– राहुलला भाजपवाले का घाबरतायतं
– आया बहिणींची छेड काढणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करा
– मुंबई पोलिसांनी ठरवल्यास मंदिराबाहेरील चप्पलही चोरीला जाणार नाही
– जे सरकारला जमलं नाही ते मनसेने करुन दाखवलं
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.