आपल्या खास शैलीत राज ठाकरेंनी मारले एकाच दगडात दोन पक्षी

आपल्या खास शैलीत राज ठाकरेंनी मारले एकाच दगडात दोन पक्षी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

 

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला एकाचवेळी लक्ष्य केल आहे. मुंबईत पालिका पालिकेचं काम करत नाही. इतर एजन्सी देखील काम करत

नाहीत. त्यामुळे फक्त पालिकेला दोष देऊन काही फायदा नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

 

पंतप्रधान मोदींनी आधी मनपा आणि मंत्रालयातील साफ-सफाई करावी. आपल्याला नेहमी पाणी साठल्यावरच का आठवतं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला

आहे.

 

माझा आरक्षण या गोष्टीलाचं विरोध असून राज्यातील नोकऱ्या मराठी मुला-मुलींना दिल्या तर आरक्षणाचा प्रश्नच उद्धभवणार नसल्याचं देखील राज ठाकरे म्हणालेत.

 

मुंबईत मेट्रो प्रकल्प कोणासाठी होतोय? मेट्रोवर होणारा खर्च हा रेल्वेवर करावा असा सल्ला देखील राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version