मोदी-शहा जोडगोळीला कुंचल्यातून फटकारा

मोदी-शहा जोडगोळीला कुंचल्यातून फटकारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सध्या बॉल टॅम्परिंग प्रकरणी चर्चेला उधाण आले आहे. त्याचाच आधार घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंग्यचित्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधला आहे.

या व्यंग्यचित्रात मोदी आणि अमित शहा एकमेकांसोबत गूढ चर्चा करत असल्याचे दाखवले आहे. अमित शहा यांच्या हातात चेंडू असून, 2014 चे जुमले 2019 मध्ये चालतील असं वाटत नाही, अशी चर्चा करतानाचं व्यंग्यचित्र राज ठाकरे यांनी रेखाटले आहे. राज ठाकरे यांनी या व्यंग्यचित्राला ‘दिल्लीच्या ड्रेसिंगरुममधील चर्चा’ हे शीर्षक दिले आहे.

“गोतमभाईला सांगून ओस्ट्रेलियासून पोलिसपेपर मांगवून घासून पायला, पन हे बोल पुना 2019 मदी स्विंग होएलयं वाटात नाय!” अशी चर्चा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा करत असल्याचे या व्यंग्यचित्रातून दर्शवण्यात आले आहे.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version