जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कर्नाटकातील भाजपाचा विजय म्हणजे ईव्हीएम मशिनचा घोळ अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून व्यक्त केली आहे.
‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. यापूर्वीही राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशिन्सबाबत साशंकता व्यक्त केली होती. त्यामुळे आता भाजपाचे नेते या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
#KarnatakaVerdict
It’s a victory for the ‘Electronic Voting Machine’ ! — Raj Thackeray (@RajThackeray) May 15, 2018
#KarnatakaElections
‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो. — Raj Thackeray (@RajThackeray) May 15, 2018
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.