हॉकिंग झोनमध्ये राज ठाकरेंच्या कृष्णकुंजचा समावेश

हॉकिंग झोनमध्ये राज ठाकरेंच्या कृष्णकुंजचा समावेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या राज ठाकरेंची महापालिकेनं थट्टा केलीय का असा प्रश्न विचारला जातोय. याला कारणही असंच आहे. महापालिकेने नुकतीच हाँकिंग आणि नाँन हाँकिग झोनची यादी मुंबई पालिकेने 24 वाँर्डात जारी केली आहे.

यात हाँकिंग झोनमध्ये राज ठाकरेंच्या कृष्णकुंज येथील रस्त्याचा समावेश आहे. तर,  महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या कलानगर मधील मातोश्री येथील रस्त्यांचा नाँन हाँकिग झोन मध्ये समावेश केला गेलाय.

यावेळी मनसैनिकांचा आरोप होतोय कि या राज ठाकरेंनी रेल्वे स्टेनच्या बाहेरील हाँकर्सला मनसे स्टाईलने हकलून दिल्याने मुंबई महापालिकेतल्या सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाच्या आधिकाऱ्यांनी मिळून हा हाँकर्स झोन निर्माण केला आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version