शरद पवारांवर बरसले राज ठाकरे

शरद पवारांवर बरसले राज ठाकरे

‘शरद पवार जातीजातीत भेद माजवतायत, पवारांना मी केलेली टीका झोंबली. ‘पवारांनी संदर्भासहित प्रबोधनकार वाचावेत’ असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.

प्रबोधनकार भेट-भिक्षुकीच्या विरोधात होते. प्रबोधनकार यांच्या लिखाणाचे संदर्भ पवारांना द्यायला हवेत. प्रबोधनकार हे कडवट हिंदुत्ववादी होते, असं देखिल ते म्हणाले.

शरद पवारांनी जातीयवाद वाढवला असून राष्ट्रवादीने जातीय तेढ वाढवली आहे. अशी टीका त्यांनी पवारांवर केली. पवार ब्राह्मणांच्याविरोधात ठरवून अपप्रचार करत आहेत. जेम्स लेनला पवारांनी का फरफटत आणला नाहीत? रामदास स्वामींकडे जातीय चष्म्यातून पाहणार का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. शरद पवारांना हिंदू शब्दाची ऍलर्जी आहे. पवारांनी अठरा पगड जातीत विष कालवले असल्याचं ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version