जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
‘काँग्रेसने सरदार पटेलांना डावलून नेहरूंना पंतप्रधान केले’ असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. पंतप्रधानांच्या या विधानाचा राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून चांगला समाचार घेतला आहे.
राज ठाकरेंनी फेसवुकवर पोस्ट केलेल्या व्यंगचित्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भारताचा इतिहास शिकवताना दिसत आहेत. या व्यंगचित्रासह त्यांनी एक पोस्टही शेअर केली आहे.
काय म्हंटले आहे राज ठाकरे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये
अरे बेटा नरेंद्र, तुला जर दोन गोष्टी सांगायच्या आहेत !
जवाहरलालना पंतप्रधान मी केले ! कॉंग्रेसने नाही ! यावर काही बोलायचयं ?
आणि दुसरं म्हणजे वल्लभभाई जरी जरी देशाचे गृहमंत्री होते
तरी ते ‘कॉंग्रेसचेच’ नेते होते ना ? मग तुला त्यांचा पुतळा उभारावासा वाटला ! पण तू जिथून आलास त्या हेडगेवारांचा किंवा गोळवलकरांचा पुतळा उभारावासा का नाही वाटला ? प्रचारक होतास ना तू ?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.