राज ठाकरे करणार पक्ष संघटनेत मोठं ऑपरेशन

राज ठाकरे करणार पक्ष संघटनेत मोठं ऑपरेशन

जय महाराट्र न्यूज, नाशिक

 

मुंबई महापालिकेत मनसेचे पानीपत झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्वच ठिकाणी पुन्हा नव्याने पक्षाची पुनर्बांधणी सुरू केली.

मुंबई, पुणे, कल्याण डोंबवलीनंतर आता राज ठाकरेंनी नाशिकवर लक्ष केंद्रीत केले आहे. 10 नोव्हेंबरपासून तीन दिवस राज ठाकरे नाशिकमध्ये मुक्काम ठोकणार आहे.

महापालिका निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर प्रथमच राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. राज ठाकरेंकडून पक्ष संघटनेत मोठे ऑपरेशन केले जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच, काही माजी नगरसेवकांची घरवापसी त्यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version