राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर

नाशिक, १९ मे २०२३, प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे ३ दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. शुक्रवारपासून राज यांचा नाशिक दौऱ्याला सुरवात होणार असून, राज नाशिकमध्ये बैठका घेणार आहेत. तसेच शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास राज ठाकरेंचं नाशकात आगमन होणार आहे.

या दौऱ्यात राज ठाकरे शहरातील वेगवेगळ्या भागातील शाखाध्यक्ष आणि स्थानिक कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. याच सोबत शेतकरी संघटनेसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची देखील राज भेट घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मनसे नेते पदाधिकाऱ्यांना राज काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच राज ठाकरेंची नाशिक मध्ये पत्रकार परिषद देखील होणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर नवीन शहराध्यक्ष राज ठाकरे नेमणार का ही पण महत्त्वाचं ठरणार आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version