मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मोठ्या कालावधीनंतर नाशिक दौऱ्यावर येत आहेत. आगामी संभाव्य निवडणुकीच्या दृष्टीने रणनिती ठरवण्यासाठी १८ ते २० मे असा तीन दिवसांचा राज ठाकरे यांचा दौरा असणार आहे. एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिककडे राज ठाकरे यांनी दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा लक्ष दिले आहे. या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठका आणि महत्त्वाचे निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला होता. त्यामुळे या दौऱ्यात नवीन शहराध्यक्षांची देखील नियुक्ती होणार असल्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.