जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सातत्याने मराठी भाषिकबद्दल द्वेष पासरवणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिकेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रण दिले आहे.
प्रादेशिक भाषा अस्मितेची मोट बांधण्यासाठी एक दिवसीय चर्चा शिबिराचं बंगळुरूत आयोजन करण्यात आले. येत्या शनिवारी हे एक दिवसीय चर्चा शिबिर होत आहे.
देशभरात प्रादेशिक भाषा अस्मिता कडवटपणे जपणाऱ्या राजकीय पक्ष आणि संघटनांना या शिबिरासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.
यामध्ये मनसे सहभागी होणार का हा प्रश्न आहे. शिवसेनेला अद्याप आमंत्रण नसल्याची सूत्रांची माहिती आहे. हिंदुत्व आणि प्रादेशिक भाषा अस्मिता अशा दोन्ही
दगडांवर पाय असल्याने शिवसेनेला सहभागी न करून घेण्याकडे आयोजकांचा कल असल्याचं समजते.
बंगळुरूमध्ये मेट्रो स्थानकांच्या हिंदी भाषेत नामकरणाचा वाद पेटलाय. त्या पार्श्वभूमीवर या शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे.
डीएके, एआयडीएमके, तेलगू देसम, तृणमूल काँग्रेस, अशा सर्वांनाच आमंत्रण देण्यात आलेय. भाषा अस्मितेसाठी प्रसंगी राज्यांमधले आपापसातले टोकाचे मतभेद बाजूला
ठेवत हिंदी भाषा अतिक्रमण विरोधी लढा उभारण्यासाठी प्रादेशिक मोट बांधण्याचा कर्नाटक रक्षण वेदिकेचा हेतू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.