“क्या है रे इकडे? चलो पलिकडे!” राज ठाकरेंचा कुंचल्यातून मोहन भागवतांवर निशाणा

“क्या है रे इकडे? चलो पलिकडे!” राज ठाकरेंचा कुंचल्यातून मोहन भागवतांवर निशाणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आपल्या व्यंगचित्रांसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यावर निशाणा साधत एक व्यंगचित्र तयार केले आहे. विशेष म्हणजे त्यांला नाव ही जरा हटके म्हणून “थंडीतलं एक उबदार स्वप्न !” असं नाव दिल आहे.

या व्यंगचित्रात ‘सैनिकांना देशसेवेसाठी तयार होण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात. मात्र देशाला गरज पडली तर तीन दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सज्ज होतील.’ असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. या वक्तव्यावर राज ठाकरेंनी कुंचल्यातून निशाणा साधलाय.

व्यंगचित्रात सरसंघचालक मोहन भागवत झोपले असून त्यांना स्वप्न पडल्याचं व्यंगचित्रातून दाखवण्यात आलंय.  भारत-पाकिस्तानची बॉर्डर दाखवून अलिकडे मोहन भागवत आणि त्यांचे स्वयंसेवक उभे आहेत तर पलिकडे पाक लष्कर आणि अतिरेकी उभे असल्याचे त्यांनी या व्यंगचित्रात दाखवले आहे. तर मोहन भागवतेंच्या समोर संघ विचार, बौधिक आणि चिंतन अशी पुस्तके ठेऊन त्यांना निघून जावा नाहीतर पुस्तकांचा हल्ला करू असं ते सांगत त्यांना पळून जायला सांगत आहेत. थंडीतील एक उबदार स्वप्न असं असल्याचं या व्यंगचित्रातून म्हंटलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version