जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांच्या विरोधात तक्रारींचा ओघ सुरु असताना दुसरीकडे डी.एस.कुलकर्णी च्या समर्थनार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत डी.एस.कुलकर्णी यांच्या ठेवीदारांचा मेळावा घेतला जाणार आहे. हा मेळावा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
शुक्रवारी सकाळी 11 वाजता दरोडे हॉलमध्ये सुरु होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे ठेवीदारांशी संवाद साधणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.