जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्रातून भाजपवर टीका केलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पत्रकार परिषद व न्यायाधीश लोया प्रकरणावरून राज यांनी भाजपवर फटकारे ओढलेत.
या पोस्ट सोबतच त्यांनी सध्याच्या सरकारचं कर्तृत्वच असं की व्यंगचित्रकारांना विषयांची कमतरता जाणवूच शकत नाही असंही म्हंटलंय.19 जानेवारीला ‘हजयात्रेच्या अनुदानावरचं’ किंवा 23 जानेवारीचं ‘गुजरात निवडणुक’ निकालांवरचं व्यंगचित्र तुम्ही पाहिलं असेलच.
पण, तरीही अनेक विषयांवर तडाखे द्यायचे बाकी आहेत. त्यातलेच काही माझे ‘फटकारे’. तुम्हाला ते आवडतील आणि तुम्ही त्यातून योग्य तो बोध घ्याल अशी मी आशा करतो. असंही राज यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.