लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभर सभा घेत आहेत. मुंबईतील भांडुप येथे दुसरी सभा पार पडली आहे. या सभेमध्येही नेहमी प्रमाणे आपल्या शैलीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. भाजपाच्या भोपाळ मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी 26/11 हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते. मात्र तरीही भाजपाने त्यांनी उमेदवारी जाहीर केली.
साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्याविरोधात केलेल्या विधानानंतर त्यांनी उमेदवारी जाहीर केली.
या विधानामुळे भाजपावर प्रचंड टीका केल्यामुळे हे विधान योग्य नसल्याचे भाजपाने म्हटलं आहे.
साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना असं विधान करताना काही वाटतं कसे नाही ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
सरकारच्या योजनांच्या जाहिरातींवर साडेचार हजार रुपये कोटी खर्च केले.
लोकांना नोकऱ्या मिळाल्या नाही तसेच उद्योगही उभा केला नसल्याचा आरोप राज ठाकरे यांनी लावला.
जाहीरांतीवर पैसे खर्च करून नागरिकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे.
नमामि गंगेच्या प्रकल्पासाठी 20 हजार कोटी राखीव ठेवले.
मात्र गंगा साफ केली नाही तर फक्त घाट बांधले.
5 वर्षात मोदींनी पंडित नेहरू, इंदिरा गांधींना शिव्या घातल्या आहेत.
गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडेले असून आधीच्या सरकारच्या काळात गॅसचे दर 410 वर होते, मात्र आता 800 वर पोहोचले आहे.
विरोधी पक्षात असताना दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ असं मोदी म्हणाले होते.
नोटबंदी आणि जीएसटीमुळे साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या.
पुलवामा हल्ला होणार असल्याची पूर्वसूचना करण्यात आली असून सुद्धा काळजी घेतली नाही.
देश संपूर्ण दुखात असताना मोदी रंग बिरंगी कपडे घालत होते.
एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारल्या गेली याची माहिती एअरचीफ मार्शललाही नव्हती मात्र तरीही शाह 250ची आकडेवारी देत आहेत.
किरीट सोमय्यांनी व्होटिंग मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप 2014 रोजी केला होता. मात्र आता त्यावर काही बोलत का नाही ?
रेल्वे अपघातात दिवसाला ९ माणसं मृत्युमुखी पडतात.
एका अपघातात स्थानिक मुलगी मोनिका जिचे दोन्ही हात गेले यासाठी कोण जबाबदार आहे ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.