जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवरती सडकून टीका केलेली आहे.
दुध आंदोलनामध्ये सरकार दोषी आहे.आधी माहीत होतं की आंदोलन होणार आहे तर बैठक का नाही घेतली, हे राज्य सरकार काहीच करत नाहीये तसाच विषय दुधाचा आहे, बाहेर राज्यातील अमूल वगैरे दूध जे आहे हे इथे घुसवायचा प्रकार चालू आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली.
तर नीट परीक्षा बाबतीत बाहेरून मुले भरली गेली तर त्यांच्यावर आमची नजर असेल? याला हवी तर धमकी समजा, पहिल्यांदा आमच्या राज्यातील मुलांनाच संधी द्यावी मग जागा असतील तर इतरांना द्या असा इशारा यावेळी राज यांनी दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.