राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज औरंगाबादच्या एका हॉटेलमध्ये काही काळ थांबले होते, मात्र हॉटेलमध्ये ते एकमेकांसोबत बोलले नाही किंवा भेटले नाहीत.
राज ठाकरे हे त्यांच्या रूममध्ये होते तर शरद पवार ते चिखली येथून कार्यक्रम आटोपून थेट पत्रकार परिषदेमध्ये आले होते.
त्यानंतर मुंबईकडे एकाच विमानातून ते पुढे निघाले, शरद पवार आणि राज ठाकरे एकाच विमनातून प्रवास करत असल्याने विमानामध्ये ते एका जवळच्या खुर्चीत असल्याचे सांगितले जात आहे.
दोघेही एकाच हॉटेलमध्ये होते आणि दोघांनी एकाच विमानातून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात याविषयी चर्चेला उधाण आलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.