जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमातून उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका करत पुढील लोकसभा आणि विधान सभेच्या निवडणूकीमध्ये युती न करता एकला चलो रे भूमिका ठेवली होती.
मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करण्यासाठी कुंचल्याचा उपयोग केला. राज ठाकरे यांच्या फेसबुकवरील अधिकृत पेज वर व्यंगचित्र अपलोड केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.