शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी राज ठाकरेंनी कंबर कसली; मनसेची आणखी एक कायदेशीर खेळी

शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी राज ठाकरेंनी कंबर कसली; मनसेची आणखी एक कायदेशीर खेळी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसलेली दिसत आहे. मनसेनेने आणखी एक कायदेशीर खेळी केली. मनसेतून फुटून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांना आणि मनसेत राहिलेल्या एका नगरसेवकाला पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आलाय.

राज ठाकरे यांच्याकडून पुढील सूचना येईपर्यंत महापालिका सभागृहात तसेच समिती बैठकांमध्ये मतदान करु नये, असा व्हीप बजवण्यात आला आहे. व्हीपचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय.

सहा नगरसेवक जरी शिवसेनेत गेले असले तरी तांत्रिकदृष्टी ते मनसेत आहेत. तसा दावा मनसेनेने केलाय.

फुटून शिवसेनेत गेलेले नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या अजून आमचेच, असे सांगत मनसेनेने त्यांना हा व्हीप बजवलाय आणि हा व्हीप बजावण्याचा अधिकार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आलेय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version