दाऊदला भारतात येण्याची इच्छा आहे पण… राज ठाकरेंचा सनसनाटी आरोप

दाऊदला भारतात येण्याची इच्छा आहे पण… राज ठाकरेंचा सनसनाटी आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला भारतात आणण्याचं श्रेय मोदी सरकार लाटणार, असा सनसनाटी आरोप मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केला आहे.

 

दाऊदला भारतात येण्याची इच्छा आहे. मात्र, पंतप्रधान मोदी आपण दाऊदला पकडून भारतात आणलं असा डंका पिटणार, असं राज ठाकरे म्हणालेत.

 

इतकी वर्ष झाली, इतक्या वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही, ते आम्ही केलं, दाऊदला आमच्या पंतप्रधानांनी पकडून आणलं, असा दावा भाजप करणार आणि श्रेय लाटून आगामी निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी त्याचा फायदा करुन घेणार, असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version