जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधलाय.
‘लक्ष्मीपूजना’चा मुहूर्त साधत राज ठाकरेंनी मोदी-शहा जोडगोळीला लक्ष्यसाधत राज ठाकरेंनी मोदी-शहा जोडगोळीवर टीका केलेय.
राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रावर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. राज ठाकरेंनी रेखाटलेल्या चित्रात ‘लक्ष्मी’ देवी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे देश चालवण्यासाठी पैसे मागताना दिसत आहे.
लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचे पूजन करुन समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते. भरभराटीसाठी लक्ष्मी प्रसन्न व्हावी, असा अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात खुद्द लक्ष्मी देवीच मोदी आणि शहांकडे देश चालवण्यासाठी पैसे मागताना दिसत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.