कोकणातील ‘तो’ प्रकल्प रद्द व्हावा यासाठी प्रकल्पग्रस्तांनी घेतली राज ठाकरेंची भेट

कोकणातील ‘तो’ प्रकल्प रद्द व्हावा यासाठी प्रकल्पग्रस्तांनी घेतली राज ठाकरेंची भेट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोकणातील रत्नागिरी येथे प्रस्तावित नानार रिफायनरी प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

मनसेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, राजापूर तालुका अध्यक्ष राजु पवार आणि रिफाईनरी संघर्ष समितीच्या सदस्य कृष्ण कुंजवर राज ठाकरेंच्या भेटीला आले होते.

दरम्यान, कोकणातील रत्नागिरी येथे प्रस्तावित नानार रिफायनरी प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी कोकणातील काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन केले.

नाणार येथील संभाव्य रिफायनरी प्रकल्प जैतापूर प्रकल्पापासून फक्त 15 किमी अंतरावर असून आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा मानकानुसार हे चुकीच असल्याचा दावा काँग्रेस आमदार हुसन खलीपे यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत खेडचे आमदार संजय कदम , आमदार विद्या चव्हाण आणि आमदार आनंदराव चव्हाण उपस्थित होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version