जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
समृद्धी महामार्गाचं काम स्थानिकांना विश्वासात घेऊनच केलं जाईल, असा सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.
राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत समृद्धी महामार्गावरुन शंका उपस्थित केली होती. सरकार समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना विश्वासात घेत नसून या महामार्गाच्या आडून वेगळ्या विदर्भाची चूल रचली जात असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला होता.
यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. समृद्धी महामार्गाच्या कामात स्थानिकांना विश्वासात घेऊनच काम केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.