बारसू रिफायनरी प्रकल्पाने गेले बरेच दिवस राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली आहे. याच पार्श्ववभूमीवर राजा ठाकरे यांनी रत्नागिरीत सभा घेतली. या सभेत राज ठाकरेंनी उद्धव यांच्यावर सडकून टीका केली आहे.
रत्नागिरीच्या सभेत बोलत असताना राज ठाकरे यांनी शरद पवार, अजित पवार तसेच उद्धव ठाकरेंवरही यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘शरद पवारांना शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता पण अजित पवार यांच्या वागण्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घेतला असं म्हणत अजित पवारांना राजीनाम्याच्या निर्णयाने जणू उकळ्या फुटत होत्या असा खोचक टोला लगावला आहे. तर, मुंबई – गोवा आजवर झालेला नाही अशीही टीका केली.
त्याचबरोबर, बारसू आलं कुठून? असा प्रश्न करत तुमची जमीन जातेच कशी? असे प्रश्न करत सातत्याने कोकणाचे शोषण करणारे निवडून येतायत असं म्हणत कोकणवासियांचे राज यांनी कान उपटले. तसेच, कातळशिल्पाच्या भोवती विकास अशक्य असल्याचे विधान राज यांनी केले. तर, बारसू प्रकल्पाला राज यांचाही विरोध असल्याचे त्यांनी या सभेत स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईचा महापौर बंगला लोकांना विचारून ढापलात? असा खोचक प्रश्न विचारत राज यांची उद्धव यांच्यावर सडकून टीका केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.