Raisen Crime Case : सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला पकडण्यासाठी 300 पोलिसांची फौज; आरोपी अखेर गजाआड

रायसेन जिल्ह्यातील सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणारा आरोपी सलमानला पाच दिवसांच्या शोधानंतर अटक करण्यात आला. 300 पोलिसांच्या मोहीमेनंतर कीरत नगर भागात तो पकडला गेला.
Raisen Crime Case : सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला पकडण्यासाठी 300 पोलिसांची फौज; आरोपी अखेर गजाआड

मध्य प्रदेशातील रायसेन (Raisen) जिल्ह्यातील सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून फरार झालेला आरोपी सलमान अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गेल्या पाच दिवसांपासून 300 पोलिस त्याच्या मागावर होते. लोकांमध्ये प्रचंड संताप असून आरोपीच्या अटकेसाठी परिसरात आंदोलने होत होती. एक दिवस आधी सलमान गौहरगंज (Goharganj) परिसरात दिसला होता, त्यानंतर पोलिसांवर दबाव अधिक वाढला होता. गुरुवारी अखेर तो कीरत नगर (Kirat Nagar) भागात पकडला गेला.

पोलिसांच्या माहितीनुसार, सलमानवर 30,000 रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. रायसेनचे एसपी आशुतोष गुप्ता (Ashutosh Gupta) यांनी सांगितले, “आमच्या विशेष पथकांनी अचूक माहितीच्या आधारे सलमानला अटक केली. मात्र त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल हिसकावून गोळीबार केला. आत्मरक्षणासाठी पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यात त्याच्या पायाला गोळी लागली.”

हेही वाचा: Imran Khan Sister : 'रस्त्यावर उतरलात तर पुन्हा गोळीबार होऊ शकतो'; इम्रान खानच्या बहिणीचे वक्तव्य

पोलिसांनी सांगितले की सलमानला भोपाळच्या (Bhopal) वार्ड क्रमांक 11 मधील एका चहाच्या दुकानातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला गोहरगंज पोलिसांच्या हवाली करण्यात आले. रायसेनकडे नेत असताना भोजपूर (Bhojpur) परिसरात त्याने पुन्हा पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात झालेल्या कारवाईत तो जखमी झाला. सध्या त्याच्यावर भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात (Hamidia Hospital) उपचार सुरू आहेत. या प्रकरणाने पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आरोपी सलमान याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका व्हिडिओमध्ये तो ट्रॅक्टरचालकाला दिशा दाखवत असल्याचे दिसले, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो स्थानिक दुकानातून सिगारेट घेताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. हे सर्व त्या भागातच झाले, जिथे त्याने गुन्हा केला होता.

पोलिस तपासानुसार, शुक्रवारी सायंकाळी 6 वर्षांची बालिका घराबाहेर खेळत असताना 23 वर्षीय सलमान तेथे आला. त्याने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून बालिकेला आपल्या सोबत नेले आणि थोड्या अंतरावर जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. गुन्ह्यानंतर तो पळून गेला. बालिका घरी परतली नाही म्हणून पालक आणि ग्रामस्थांनी शोध सुरू केला आणि काही वेळाने ती जंगलात रडत अवस्थेत सापडली. औबेदुल्लागंज (Obedullaganj) येथील रुग्णालयात तपासणीदरम्यान बलात्काराची पुष्टी झाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला. अखेर पाच दिवसांच्या शोधानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले असून पुढील चौकशी सुरू आहे.

हेही वाचा: Anti Polygamy Bill : पुरुषांनो! एकापेक्षा जास्त लग्न कराल तर भोगावा लागेल कारावास; या विधेयकाला मिळाली मंजुरी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version