कोकण विभागात शनिवारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही सोमवारपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळं नद्यांनी रौद्ररुप धारण केलं असून जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळं नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात रविवार रात्रीपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.सतत कोसळणाऱ्या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईसह कोकणातही पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं नद्यांना पूर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही सोमवारपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळं नद्यांनी रौद्ररुप धारण केले आहे. राजापूर, खेड, चिपळूण या भागांतही जोरदार पावसाची बॅटिंग सुरु आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याने प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता. 🌧🌧
📢 कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचे इशारे.
🌊🌊कोकणात पूर परिस्थिती अनेक ठिकाणी… https://t.co/kxlIAKcXa7 — K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार रात्रीपासून संततधार सुरू असून खेड, चिपळूण, देवरूख, लांजा, राजापूर तालुक्यांना जोरदार तडाखा बसला आहे. राजापूर शहर व ग्रामीण भागातील प्रचंड पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे जवाहर चौकात पुराचे पाणी भरले आहे.कोकण विभागात शनिवारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही सोमवारपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांनी रौद्ररुप धारण केले आहे . जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.रत्नागिरी जिल्हयात दक्षिण रत्नागिरी येथील लांजा, राजापूर येथे तर उत्तर रत्नागिरीतील दापोली, खेड, गुहागर येथे दिवसभर झालेल्या तूफान पावसामुळे पाणी साचले आहे. तर, काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकारही घडले आहेत. कोकणात मुसळधार पाऊस पाहता राज्य सरकारने त्वरित कठोर पावले उचलली आहेत. तसेच , एनडीआरएफच्या तुकड्याही कोकणासाठी पाठवण्यात आल्या आहेत
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.