यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता

यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

यंदा राज्यात लवकर मान्सून आगमनाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व व पश्चिम विदर्भात काही भागात गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यता आहे.

 

राज्याच्या बहुतांश भागात अवेळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रासह अनेक भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह कोकणात व गोव्यात आकाश काही अंशी ढगाळलेले राहिल, असा अंदाजही व्यक्त केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version