सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अनेक नद्यांची पातळी वाढली आहे. 4 ते 6 जुलै पर्यंत मुसळधार पाऊस कायम असणार आहे. मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यादरम्यानच सीएमओ कार्यालयाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
वादळी वाऱ्यांसह होणाऱ्या पावसामुळे झाडे पडणे, वीजपुरवठा खंडित होणे किंवा वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा धोका अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. नदीकाठ, डोंगराळ भाग आणि सखल वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे. बृहृन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 1916, पालघर हेल्पलाईन क्रमांक – 02525 297474, +91 82379 78873, ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827 ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101 पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 02227458040/41/42
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.