Weather Update : मुंबईसह 10 जिल्ह्यांना पुढील काही तास महत्त्वाचे! पुण्याला रेड अलर्ट, तर कोकणात 24 तासांत…

बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा राज्यात सक्रिय झाला असून मुंबईसह कोकण, मराठवाडा, विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे.
Weather Update : मुंबईसह 10 जिल्ह्यांना पुढील काही तास महत्त्वाचे! पुण्याला रेड अलर्ट, तर कोकणात 24 तासांत…

बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा राज्यात सक्रिय झाला असून मुंबईसह कोकण, मराठवाडा, विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनला बळ मिळत असून उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भात या भागांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील तीन तास राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याच्या इशारा देण्यात आला आहे. यावेळी अरबी समुद्रातून किनारपट्टीकडे येणाऱ्या वाऱ्यांचा वेग जास्त असल्याने फक्त पाऊस नाही तर कोकण आणि किनारपट्टीलगत भागात वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस पुढचे 48 तास राहणार आहे.

दरम्यान आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुंबईत सकाळपासून संततधार सुरू आहे. मुंबईत ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतः राहण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबईसाठी महत्त्वाचे असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तावला आहे. मुंबईसह पालघर, ठाणे आणि कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोर धरला आहे. त्यामुळए किनारपट्टी आणि समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

हेही वाचा- Maharashtra Weather: पुढील तीन दिवस सतर्क राहा! महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती

पुण्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. यावेळी पुण्यात सर्वाधिक 423.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच ताम्हिणी घाट, लोणावळा, मुळशी, खंडाळा आणि इतर घाटमाथा परिसरातही जोरदार पावसाची हजेरी लागली आहे. मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यावेळी पुण्यातील घाटमाथा आणि धरण परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

तर धुळे शहरासह जिल्हाभरामध्ये जुलै महिन्याच्या सुरवातला तीन-चार दिवस पाऊस पडल्यानंतर मोठी विश्रांती घेतली आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहे. गोंदिया जिल्ह्यात काल संध्याकाळपासून काही भागात संततधार पाऊस सुरू आहे. तर काही भागात पावसाची रिप रिप सुरू असून सकाळी सुद्धा पावसाची रिप रिप कायम आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील धान पिकाला मोठा फायदा होत असून धान रोवणीच्या कामाला वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी असून यंदा चांगल्या उत्पादनाची आशा व्यक्त करत आहेत. हवामान खात्यानेही पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version