राज्यात पुढचे 24 तास मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज

राज्यात पुढचे 24 तास मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात पुढचे 24 तास मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

 

मुंबईसह ठाणे, पालघर, कोकणासह, मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सातारा या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने

दिला आहे.

 

मोठ्या ब्रेकनंतर पावसानं कमबॅक केले. पण, पुन्हा आलेला पाऊस अक्षरक्ष धो धो बरसला. नाशिक जिल्ह्यात पावसानं सर्वाधिक थैमान घातले.

 

गोदावरी दुधडी भरून वाहू लागली. माळशेज घाट, इगतपुरीमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली.

 

मुंबईसह उपनगरातही मुसळधार पाऊस कोसळला.  अलिबाग, महाड, माथेरान तसंच कर्जत या भागात रात्री संततधार पाऊस कोसळत होता.

 

गडचिरोलीच्या अनेक भागात रिमझिम पाऊस सुरु आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं जोरदार धुमाकूळ घातला.

 

पुण्यातही पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version