जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नैऋत्य मान्सूनने वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात केलीय.
पुढील 48 तासांत मध्य, पूर्व आणि पश्चिम भारताच्या काही भागातून मान्सूनची माघार सुरू होईल. पण, अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या लखलखाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
मुंबईतही पुढील चोवीस तासांत गडगडाटासह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलीय. अजून 15 ते 20 दिवस मान्सूनचा मुक्काम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.