राज्यात यंदा 100% पावसाचा अंदाज

राज्यात यंदा 100% पावसाचा अंदाज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

यंदा देशात सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच मुंबईत 13 ते 14 जूनपर्यंत पावसाचे आगमन होण्याचा अंदाज आहे. राज्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे यंदा 100 टक्के पाऊस पडू शकतो.

 

एप्रिलमध्ये देशभरात सरासरीच्या 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मे महिन्यात परिस्थिती बदलल्याने सरासरीच्या 98 टक्के पावसाचा नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

केरळमध्ये वेळेत प्रवेश केलेल्या मान्सूनचा राज्यातील प्रवेश मात्र लांबणीवर पडला आहे. रविवार किंवा सोमवारपर्यंत मोसमी वारे राज्यात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. सलग दुसऱ्या वर्षी राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

 

गेल्यावर्षी महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पाऊस पडला होता. यावेळीही मध्य भारतात 100 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version