महिला असुरक्षित; रेल्वे प्रवासात जीवघेणा हल्ला

महिला असुरक्षित; रेल्वे प्रवासात जीवघेणा हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रेल्वेतून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या अनेक तक्रारी समोर येतायत. मुंब्राच्या पारसिक बोगद्यातून लोकल जात असताना महिलांच्या डब्यांवर धारदार अवजड वस्तू फेकल्याची घटना घडली. मागील दोन दिवसांत दोन महिलांवर काही तरुणांकडून धारदार वस्तू फेकून गंभीररीत्या जखमी करण्यात आले होते.

डोंबिवलीत राहणाऱ्या विद्या कोळी यांना महिला डब्याच्या दिशेने भिरकवण्यात आलेली वस्तू लागली. त्यांच्या पायाच्या घोटय़ावर फ्रॅक्चर झाले असल्याने यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वी एका तरुणीसोबत घडला. तिच्या चेहऱ्यावर बॉटल फेकून मारण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. मात्र, या सर्व प्रकारामुळे महिला प्रवाशांमध्ये भातीचे वातवरण पसरले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version