Mumbai Local Train Services : पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने

Mumbai Local Train Services : पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने

मुंबई : मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून मुसळधार पावसाचा परिणाम लोकल गाड्यांवरही पाहायला मिळत आहे. मुंबईसह उपनगरात तसेच ठाणे, पालघर, नवी मुंबईत पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू असून त्यामुळे रेल्वे मार्गाची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना उशीराने धावणाऱ्या लोकलने प्रवास करावा लागत आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तिनही मार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरू असून इच्छितस्थळी पोहोचण्यास उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. मध्य रेल्वे जलद गतीच्या लोकल 15 ते 20 मिनिट उशिराने धावत असून धीम्या गतीच्या लोकल 10 ते 12 मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच हार्बर मार्गावरील लोकलसुद्धा 10 मिनिटे उशिराने धावत असून पश्चिम मार्गावरील वाहतूक 20 – 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे पहाटेपासून घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना रखडत लोकलचा प्रवास करावा लागत आहे.  

हेही वाचा : Landslide in Karjat-Lonavala Ghat : मध्यरात्री कर्जत – लोळावणा घाटात दरड कोसळली; एक्सप्रेसच्या काही गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलले, वाचा सविस्तर यादी

तसेच, पश्चिम रेल्वेची वाहतुकही विस्कळीत झाली असून वसई रोड आणि विरार स्थानकादरम्यान झालेल्या पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा सध्या अंदाजे 15-20 मिनिटे उशिराने धावत आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे आणि अतिरिक्त प्रवास वेळ गृहीत धरावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. तर विरार – नालासोपारा स्थानकादरम्यान रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे. येथील धीम्या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत असून धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. तर चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version