मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गांवर मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईकरांनी गरज असेल तरच, घराबाहेर पडा असे आदेश रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. अभियांत्रिकी कामे करण्यासाठी 7 डिसेंबर रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक असेल.

मध्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर सकाळी १०.३७ ते दुपारी 4.02 वाजेपर्यंत; तर हार्बर रेल्वेमार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version