जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मातृभाषा मराठी दिवस राज्यांत सर्वत्र उत्स्फूर्तुणे साजरा होत आहे. याबाबत विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. यात रेल्वे प्रशासनदेखील सामील झाले आहे. एरवी रेल्वेच्या लोकलमध्ये सतर्कतेच्या किंवा इतर उद्घोषणा होत असतात. पण, आज मात्र रेल्वेकडूनही मराठी दिनानिमित्त उद्घोषणा होत आहे.
रेल्वेच्या स्पीकर वरून “लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी” हे मराठी गीत ऐकावयास मिळत आहे. मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांवर हे गीत ऐकावयास मिळत आहे. मराठी माणसाला हे गीत जसे भुरळ पाडते. तसेच, इतरभाषिकही हे गीत ऐकताना आणि गुणगुण करताना दिसत आहेत. मुंबईच्या घाटकोपर स्टेशनवर रेल्वे प्रवाशी या गीताचा आनंद घेत आहेत. तर अशा प्रकारच्या उद्घोषणा आजच्या दिवसा पुरता न होता दररोज करण्यात याव्यात अशी अपेक्षा मराठीजन व्यक्त करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.