चालकाच्या प्रसंगावधानाने टळला रेल्वेचा मोठा अपघात

चालकाच्या प्रसंगावधानाने टळला रेल्वेचा मोठा अपघात

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

उद्गाव येथे चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला. सांगली कोल्हापूर मार्गावरील उद्गाव येथे मध्यरात्री अज्ञात वाहनाने रेल्वे ब्रिजला धडक दिल्याने रुळ दिड फूट सरकला. हि घटना मध्यरात्री 11 च्या सुमारास घडली.

या घटनेनंतर कोल्हापूरहून मिरजेला जाणाऱ्या चालकाला रुळातील बदल लक्षात आले आणि त्याने गाडी थांबवली. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला. घडल्या प्रकाराची माहिती संबधित यंत्रणेला देण्यात आली.

रुळाचे काम सुरू केल्याने कोल्हापूर मिरज मार्गावरील रेल्वे सेवा थांबवण्यात आली. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली. तब्बल 10 किलोमीटरपर्यँत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बिघडलेला रुळ सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी खबरदारी म्हणून अपघातग्रस्त पुलाखालील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version