जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शनिवारी मुंबईत मालाड ते गोरेगाव दरम्यान घडलेल्या अपघातात तीन कामगार महिलांनी प्राण गमावले. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी संभाव्य धोक्याबद्दल रेल्वेला आधीच जागं करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, रेल्वेने फक्त कार्यवाहीचं आश्वासन दिले. प्रत्यक्षात काहीच केलं नाहीये. रेल्वेनं कार्यवाही केली असती तर तीन महिलांचे जीव वाचले असते, असे अनिल गलगली यांनी म्हटलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.