Raigad: गणपतीनंतर गौराईच्या स्वागताची लगबग; बाजार मुखवटे अन् शृंगार साहित्याला मोठी मागणी

गणेशोत्सवामुळे राज्यभरात जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण आहे. बाप्पाच्या येण्याने सर्व चिंता दूर होतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हटले जाते. परंतु काल काही गणेश भक्तांनी दीड दिवसांच्या गणपतीला जड
Raigad: गणपतीनंतर गौराईच्या स्वागताची लगबग; बाजार मुखवटे अन् शृंगार साहित्याला मोठी मागणी

गणेशोत्सवामुळे राज्यभरात जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण आहे. बाप्पाच्या येण्याने सर्व चिंता दूर होतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हटले जाते. परंतु काल काही गणेश भक्तांनी दीड दिवसांच्या गणपतीला जड अंतःकरणाने निरोप दिला. आता गौरीचे आगमन होऊन तिची मनोभावे पूजा केली जाईल. बाप्पाच्या शेजारीच गौराई विराजमान केली जाते. 

उद्या दिनांक 17 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन असल्यामुळे त्याच्या तयारीसाठी गणेश भक्तांची लगबग सुरू आहे. सर्वांनाच गौराईच्या आगमनाचे वेध लागले आहेत. उद्या होणाऱ्या गौराईच्या स्वागतासाठी घराघरात जय्यत तयारी सुरू आहे. पूजेच्या साहित्यापासून ते गौराईच्या शृंगारासाठी लागणाऱ्या साहित्यापर्यंत सगळ्यालाच मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक आनंदी असून बाजारात खरेदीला उधाण आले आहे. गौरीच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ग्राहकांकडून गौरी आवाहन विधीचे साहित्य, शृंगारविषयक गोष्टींची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे.

हेही वाचा – Gauri Avahan 2026: गौरी आवाहन, गौरी पूजन म्हणजे काय? शुभ मुहूर्त, पूजेची विधी आणि गौरीचा नैवेद्य जाणून घ्या..

बाजारातील विविध आकार आणि मोहक रूपातील गौराईचे मुखवटे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. मुखवट्यांबरोबरच गौराईचे अवयव, पावले, स्टँड आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी लगबग सुरू आहे. उद्या गौरी आवाहन असून गौरीची मुळे घरात आणण्याची परंपरा आहे. त्यांचे पूजन करून मग गौराईची प्रतिकृती तयार केली जाते. अगदी नवरीप्रमाणे गौराईचा शृंगार केला जातो. तसेच दोन्ही गौरींना समान रीतीने सजवले जाते. त्यामुळे गौरीच्या शृंगार साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून सर्वत्र उत्साह संचारला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version