आदित्यचा अत्यंत निकटचा साथीदार शिंदेंकडे

आदित्यचा अत्यंत निकटचा साथीदार शिंदेंकडे

मुंबई, ३० जून २०२३, प्रतिनिधी: उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय राहुल कनाल यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला जय महाराष्ट्र केला आहे. कनाल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या पथकाने राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला होता, पण त्यात काही निष्पन्न झालं नव्हतं. अशा परिस्थितीतही राहुल कनाल यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडली नव्हती. मात्र आदित्य राजकारणात व्यस्त असल्याचा फायदा घेत काही युवासेनेचे पदाधिकारी आपल्याला डावलत असल्याचा आरोप करत कनाल यांनी ठाकरेंना रामराम केला आहे.

राज्याच्या उत्तुंग विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे राहुल कनाल यांनी म्हटले आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या युवासेना कोअर कमिटीतील पूर्वेश प्रताप सरनाईक, समाधान सदा सरवणकर, योगेश रामदास कदम, सिद्धेश कदम, अमेय घोले यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रवेशावेळी सर्वांचा रोष हा युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांवर होता. आता राहुल कनाल यांना देखील डावलण्यात आल्याचा दावा केला जात आहे. स्वाभिमानासाठी राहुल कनाल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्याची चर्चा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version