दर्शना पवार हत्याप्रकरणी राहुल हंडोरेला अटक

दर्शना पवार हत्याप्रकरणी राहुल हंडोरेला अटक

वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडच्या पायथ्याशी दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली होती. या हत्येप्रकरणी मोठी राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

किल्ले राजगडच्या पायथ्याशी एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली होती. ही तरुणी मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील आहे. मृत तरुणीचे नाव दर्शना दत्ता पवार आहे. एमपीएससीच्या परीक्षेत सहाव्या आलेल्या तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दर्शना पुण्यातून १२ जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दाखल होती. या घटनेबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात तरुणीचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना ९ जून रोजी पुण्यातील एका खासगी अकॅडमीमध्ये सत्कार स्वीकारण्यासाठी आली होती. दुसऱ्या दिवशी कुटुंबीय दर्शनाला फोन करत होते. परंतु, तिने घरातील कोणाचेही फोन उचलले नाहीत. त्यामुळे तिच्या वडिलांनी १२ जून रोजी पुण्यात येऊन अकादमीत चौकशी केली. त्यावेळी दर्शना ही राजगड किल्ला फिरण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वडील आणि पोलिसांकडून मुलीचा शोध सुरु होता. दर्शना ही एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावी आली होती. तिची ‘रेंज फॉरेस्ट ऑफिसर’ या पदावर नुकतीच निवड झाली होती. तर, या हत्येप्रकरणी मोठी राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version