पराभव जिव्हारी लागल्यामुळे राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार ?

पराभव जिव्हारी लागल्यामुळे राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार ?
लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून पुन्हा एकदा भाजपा सरकाराला पंसती दिली आहे. देशभरात 542 जागांसाठी निवडणूक लढवण्यात आली होती. 542 जागांपैकी 351 जागांवर एनडीएने विजय मिळवला आहे. एनडीएच्या स्पष्ट बहुमतामुळे विरोधक नाराज झाले आहेत. कॉंंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत पराभव स्विकारला आहे. त्याचबरोबर यावेळी मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे राहुल गांधींनी प्रस्ताव ठेवला.

राहुल गांधी राजीनामा देणार ?

लोकसभा निवडणुकीचा गुरुवारी निकाल जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेसचा भाजपाने दारूण पराभव केला.
मतमोजणीच्या सुरुवातीलाच  कॉंग्रेसला खातं उघडण्यात यश मिळाले नाही.
अनेक जागांवर कॉंग्रेसला एकही जागा मिळाल्या नाही.
देशभरात कॉंग्रेसला पराभव मिळाल्याने राहुल गांधींना जिव्हारी लागल्याचे म्हटलं जात आहे.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदींचे आणि स्मृती इराणीेंचे मनापासून अभिनंदन केले.
त्यानंतर राहुल गांधींनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्तान ठेवला.
मात्र सोनिया गांधींनी राहुल गांधींच्या राजीनाम्यावर परावृत्त केले आहे.
दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीत पुन्हा एकदा राहुल गांधी बैठकीतून राजीनामा देणार असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version