राहुल गांधी देणार शिक्षेला आव्हान

राहुल गांधी देणार शिक्षेला आव्हान

मानहानीच्या प्रकरणात सुरत सत्र न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षआ सुनावली. तसेच याप्रकरणी राहुल गांधी यांना खासदारकी पदावरून हटवण्यात आले. त्यामुळे सर्व देशभरात काँग्रेस आक्रमक झाली. दरम्यान, राहुल गांधी यांचे वकील सूरत सत्र न्यायालयात मानहानीच्या खटल्यात सुनावलेल्या शिक्षेविरोधात आव्हान देणार आहेत. यावेळी राहुल गांधी स्वत: न्यायालयात हजेरी लावणार आहे त्याचसोबत काँग्रेसमधील वरिष्ट नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते, राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक सिंघवी यांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ वकील आर. एस. चीमा सत्र न्यायालयात आव्हान दाखल करणार आहेत. सूरत न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांनी २३ मार्च रोजी दिलेल्या शिक्षेला यावेळी आव्हान देण्यात येईल. २०१९मध्ये कर्नाटकमधील कोलार येथे मोदी आडनावाबाबत आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे त्यांचे वायनाडचे लोकसभेचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यात आले. आणि त्यांना खासदारकी पदावरून हटवण्यात आले. दरम्यान, सोमवारी राहुल यांचे वकील मानहानीच्या खटल्यात सुनावलेल्या शिक्षेविरोधात आव्हान देणार आहेत. त्यामुळे राहुल गांधींना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळेल, अशी आशा काँग्रेसच्या ज्येष्ठ वकिलांनी वर्तवली आहे. तसेच, राहुल गांधी शिक्षेला स्थगिती देण्यासाठी आव्हान देणार नाहीत तर कायदेशीर त्रुटींसह मानहानीचा खटला फेटाळण्याची मागणीही करणार आहेत.

काय आहे प्रकरण ?

राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकात बोलताना एक वक्तव्य केले होते. ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?’ असे राहुल म्हणाले होते. राहुल यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार पुर्निश मोदी यांनी त्यांच्यावर एक खटला दाखल केला होता. गुरुवारी सूरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version