लोकसभेत रामायण, मोदी रावण आणि अमित शाह कुंभकर्ण

लोकसभेत रामायण, मोदी रावण आणि अमित शाह कुंभकर्ण

मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या केली असा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. ते लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलत होते.

मोदी सरकार विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाच्या बाजूने बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला.

https://youtu.be/6deMP2ZePMQ

भारत जोडो यात्रेचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी भाषणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी मणिपूरमधील हिंसक घटनांचा उल्लेख केला. मणिपूरबाबत बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत बराच वेळ गदारोळ झाला. अखेर केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी हस्तक्षेप केला. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा स्मृती इराणी यांनी निषेध केला. स्मृती इराणी यांनी बोलण्यास सुरुवात करताच राहुल गांधी सभागृहातून निघून गेले.

राहुल गांधी यांची महत्त्वाची वक्तव्ये

पुन्हा भारत जोडो यात्रा सुरू करणार
देशाला समजण्यासाठी भारत जोडो यात्रा
देशाचा आवाज ऐकण्यासाठी अहंकार सोडावा लागेल
पंतप्रधानांसाठी मणिपूर म्हणजे भारत नव्हे
मणिपूरचे दोन भाग केले
मणिपूरमध्ये केली हिंदुस्थानची हत्या
तुम्ही देशप्रेमी नव्हे, देशद्रोही
तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात
मोदी फक्त शाह आणि अदानींचे ऐकतात
मोदींना रावणाची उपमा
अमित शाहंना कुंभकर्णाची उपमा
अदानींना मेघनाथची उपमा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version